
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रसिद्ध बाटला एन्काऊंटरवर आधारित ‘बाटला हाऊस’ या चित्रपटाचा टिझर आज रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भूमिका आहे. अवघ्या 26 सेकंदाच्या या व्हिडीओत बाटला हाऊसमधील एन्काऊंटरचा थरार पाहायला मिळतो.
या चित्रपटात जॉन अब्राहम पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या टिझरची सुरुवात गोळ्यांच्या आवाजाने होते व त्याच वेळी ज़ॉन अब्राहम ‘बाटला हाऊसमध्ये काय झाले? आम्ही चुकीचे होतो का? मी चूक केली का? असे प्रश्न विचारताना दिसतो. तसेच 2008 साली घडलेल्या घटनेबद्दल तब्बल 11 वर्षानंतर आम्ही खरी गोष्ट सांगणार आहोत असा संदेश टिझर देण्यात आला आहे.
“त्या दिवशी चाललेल्या गोळ्यांचा आवाज अद्याप 11 वर्षांनंतरही ऐकू येत आहे यासाठी बटाला हाऊसची खरी गोष्ट पाहा’, असे जॉनने टिझर सोशल मिडियावर शेअर करताना लिहीले.
























































