सिंचनासाठी बीड जिल्ह्यासाठी 10 हजार विहिरींना मंजुरी

3039
mantralaya-5

बीड जिल्ह्यातील सिंचन वाढावे या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यात तब्बल 10 हजार अनुदान विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. यात बीड विधानसभा मतदार संघासाठी 2 हजार विहिरींचा समावेश आहे.

jaydutt-kshirsagar

दुष्काळ आणि निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणींचा सामना करत आहे. बीड जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी अनुदान विहिरींची संख्या वाढली पाहिजे या उद्देशाने रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर प्रयत्न करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यासाठी तब्बल 10 हजार अनुदान विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. गावागावातील शेतकऱयांना याचा थेट फायदा होणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या