गूढ आवाजाने बीड पुन्हा हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड शहरासह 15 की मी परीघ बुधवारी पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले. दुपारी 12 : 05 वाजता या गूढ आवाजाचा हादरा शहराला बसला. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्याच आठवड्यात याच वेळी भर दुपारी शहर गूढ आवाजाने हादरले होते. फेब्रुवारी महिन्यातही गूढ आवाजाने ग्रामस्थांची झोप उडवली होती. मात्र हा आवाज नक्की कशाचा हे कोड अद्यापही कायम आहे.

फेब्रुवारी महिन्यातही बीड शहरासह त्याच्या आजूबाजूची खेडी गूढ आवाजाने हादरली होती. या आवाजाची तीव्रता एवढी होती की खिडकीची तावदाने, व काचांनाही तडे पडले होते . यामुळे हादरलेले नागरिक रस्त्यावर धावत सुटले होते. पण नंतर हळूहळू आवाज यायचा थांबला व परिस्थिती निवळली.

बीडमध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून अधूनमधून अशा गूढ आवाज येण्याच्या घटना सुरू आहेत. भूगर्भात होणाऱ्या हालचालींचा हा आवाज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण विशेष म्हणजे या गूढ आवाजाबद्दल प्रशासनाकडे मात्र कोणतीच माहिती उपलब्ध नाही.