बीडच्या आदित्य मचाले याची लष्करात लेफ्टनंट पदावर निवड

बीड शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी आदित्य रमेश मचाले याची हिंदुस्थानी सैन्य दलात नुकतीच निवड झाली. आदित्य रमेश मचाले काल दिनांक 30 /9/ 20 रोजी इंडियन मिलिटरी अॅकॅडमी डेहरादून येथे रुजू झाले. येथील दीड वर्षाच्या सैनिकी प्रशिक्षणानंतर आदित्य रमेश मचाले हिंदुस्थानी सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर रुजू होतील.

बीड शहराचा तसेच बीड जिल्ह्याचा सुपुत्र भूमिपुत्र आदित्य रमेश मचाले यांच्या निवडीबद्दल त्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर तसेच डॉ भारतभूषण क्षीरसागर (अध्यक्ष नगरपरिषद ) यांनी मचाले परिवार तसेच आदित्यचे कौतुक केले अभिनंदन केले. आदित्यचे वडील उद्योजक असून आई ग्रहीणी भाऊ आजी अरुणा मचाले, तसेच दोन काका- काकू भाऊ व बहीण असा मोठा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या