थोड्याशा तुपात परतवलेले मखाणे रोज खा, होतील अनेक फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मखाणे हा अत्यंत पौष्टिक असा हिंदुस्थानी पदार्थ आहे. शिवाय पॉपकॉर्नसारखा आणि भूक लागल्यास सहज खाता येण्याजोगा नाश्ता आहे. ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी ते फारच उपयुक्त असून यामुळे भूक भागतेच शिवाय शरीरावरही दुष्परिणाम होत नाहीत. यामध्ये मँगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थायमिन, प्रीन आणि फॉस्फरस या घटकांचे प्रमाण जास्त असे. थोड्याशा तुपात परतवलेले मखाणे चहासोबत खाणे शिवाय लहान मुलांना टिफिनमध्ये देण्याकरिता हा सोपा, कमी वेळात होणारा पदार्थ आहे. पाहूया तुपात परतवलेले मखाणे खाल्ल्याने होणाऱ्या आरोग्यदायी फायद्याविषयी…

हाडांच्या मजबुतीकरिता
मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांच्या मजबुतीकरिता आवश्यक आहे. हाडे आणि सांधे यांमध्ये लवचिकपणा आणणे आणि हाडांचे आरोग्य सुधारण्याकरिता दररोज तुपात परतवलेल्या मखाण्यांचे सेवन करावे.

किडनीच्या आरोग्यासाठी 
मखाणे खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारणे. मूत्रप्रवाहावर नियंत्रण आणून किडनीचे आरोग्य सुधारण्याचे कार्य मखाण्याचा आहारात समावेश केल्याने होऊ शकते. याशिवाय शरीरातील सर्व विषारी घटक शरीराबाहेर टाकण्याकरिता तुपात तळलेल्या मखाण्यांचे सेवन गुणकारी ठरते.

ह्रदयाकरिता
मखाण्यांमध्ये कार्बोहाड्रेटससारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण येण्यास मदत होते.

हार्मोनल संतुलन
शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यास मखाणा खाल्ल्याने मदत होते. यासाठी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी मखाणा खाल्ल्यास फायदा होतो, मात्र मखाण्याचे अति सेवन टाळावे.