गणपती बाप्पा मोरया 2025 – उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा

आपल्याकडे येणारे सण सोबतच गोडाधोडाचे विविध पदार्थ घेऊन येतात. सणासुदीच्या निमित्ताने आपल्या घरी विविध गोडाचे पदार्थ होतात. असाच एक अस्सल महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ म्हणजेच मोदक. उकडीचे मोदक केवळ जिभेच्या चवीसाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे.

अवघ्या काही तासांमध्ये आपल्या घरी बाप्पाचे आगमन होईल. बाप्पाच्या आगमनानंतर घरोघरी मोदकाचा बेत रंगतो. अशावेळी हे मोदक आपल्या आरोग्यासाठी कसे उत्तम आहेत हे बघणेही तितकेच गरजेचे आहे. बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक केवळ आपल्या पोटासाठी उत्तम नाही तर या मोदकांमध्ये अनेकविध आरोग्याचे फायदे होतात.

उकडीचे मोदक खाण्याचे फायदे

मोदकाच्या सारणात वापरले जाणारे ओले खोबरे आणि सुका मेवा आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी मानला जातो.

गणपती बाप्पा मोरया 2025- बाप्पाच्या नैवेद्यासाठी साधे सोपे न फुटणारे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक

मोदकाच्या सारणात गूळ असल्यामुळे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. गूळ शरीराला उर्जा देण्यासोबत, सर्दी खोकल्यापासूनही आपल्याला आराम मिळतो.

उकडीच्या मोदकामध्ये अशी पोषक तत्त्वे आहेत. ज्यामुळे आपल्या शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल निर्माण होण्यास मदत होते.

उकडीच्या मोदकासोबत आपण तूप खातो हे तूप हे बद्धकोष्ठतेवर उत्तम रामबाण उपाय मानले जाते.

गणपती बाप्पा मोरया 2025- मऊ लुसलुशीत मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ सर्वात उत्तम, वाचा

मोदकासाठी आपण खवलेला ओला नारळ वापरतो. ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण हे मुबलक असते.

आपला मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी उकडीचे मोदक हा एक चांगला पर्याय मानला जातो.

आपल्या चेहऱ्यावर सदैव पिंपल येत असतील तर मोदक खाणे हे हितावह मानले जाते. यामुळे पिंपल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते.

गणपती बाप्पा मोरया 2025 – झटपट होणारे शाही मोदक करा घरच्या घरी, वाचा

मोदकाच्या सारणात वापरले जाणारे खोबरे व सुका मेवा यात मँगनीजचे प्रमाणही जास्त असते जे निरोगी हाडांसाठी आवश्यक असते.