
जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या तब्बल 80 सुविधा प्रशासनाने ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’वर उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पालिकेच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना 80 प्रकारच्या सुविधा घरबसल्या मिळणार आहेत. यासाठी 8999228999 हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबई महानगरापालिका नागरिकांना पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, पर्जन्य जल वाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या अशा अनेक प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देते. यातील परवाना, दाखले, शुल्क भराणा अशा अनेक सुविधांसाठी नागरिकांना प्रभाग कार्यालयात जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, वस्त्र्ााsद्योग व मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहाय्यक आयुक्त शरद उघडे, व्हॉट्सअॅप चॅटचे (सार्वजनिक धोरणे) संचालक शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर उपस्थित होते.
…म्हणूनच व्हॉट्सअप चॅट बॉट फायदेशीर
- कोरोना काळात पालिकेने अनेक आरोग्य सुविधांसह अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला. कोरोना काळात एकमेकांना भेटणेही मुश्कील झाले असताना बेड, अॅम्ब्युलन्स अशा अनेक सुविधा ऑनलाईन मिळाल्याने रुग्णांना सेवा मिळाली.
- पालिका प्रशासनालाही ऑनलाईन बैठका घेऊन नियोजन करणे सोयीचे ठरले. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेतून सुरू झालेला ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले.
24 तास सेवा
- व्हॉट्सअॅपवर चॅटबॉट ही सुविधा 8999228999 या क्रमांकावर उपलब्ध राहील. या क्रमांकावर इंग्रजीत नमस्ते पिंवा ‘हाय’ असा संदेश पाठवल्यानंतर पालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते.
- या उत्तरानंतर मराठी किंवा इंग्रजी असे दोन पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे 3 पर्याय उपलब्ध होतील. पर्याय निवडल्यानंतर सेवा-सुविधांशी पर्याय उपलब्ध होतील.





























































