1 / 6
आपल्याला केशर म्हटलं की केशरी दूध किंवा केशर पेढा आठवतो. पण, केशरी रंगाचं आणि कडवट चवीचं केशर हा एक अतिशय गुणकारी पदार्थ आहे. जाणून घेऊया केशराच्या सेवनाचे फायदे
केशराच्या नियमित सेवनाने निद्रानाश, अपचन असे त्रास तर कमी होतातच. शिवाय केशरातील Carotenoid हे द्रव्य कर्करोगापासूनही आपला बचाव करतं. मासिक पाळीतील पोटदुखीवरही केशर अतिशय गुणकारी आहे.
केशरासोबत दूध किंवा मधाच्या सेवनाने त्वचेचा पोत उजळतो. तारुण्यपीटिका, त्वचारोग, काळे डाग यावर तर केशर उपयुक्त आहेच पण तसेच त्याने रोगप्रतिकारक्षमता देखील वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.
































































