कडक निर्बंधांनंतर बेस्टचे 4.8 लाख प्रवासी घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मुंबईसह राज्यात कडक निर्बंध घातल्यानंतर मंगळवारपासून बेस्टमधून उभे प्रवासी नाकारण्यात येत असल्याने बेस्टचे 4.8 लाख प्रवासी घटले आहेत. बेस्टच्या बसेसमध्ये केवळ आसनांवर बसतील एवढेच प्रवासी कंडक्टर घेत असल्याने प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. बेस्टमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरीची ताजी आकडेवारी बुधवारी 20.3 लाख इतकी निघाली आहे. मंगळवार, 6 एप्रिलपासून राज्य सरकारने ‘मिशन ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमाप्रमाणे टॅक्सी, बेस्ट आणि लोकलमधील प्रवाशांवर निर्बंध लागू केले आहेत. टॅक्सीमध्ये चालक व दोन प्रवासी आणि बेस्ट तसेच लोकलमध्ये उभ्याने प्रवास करण्यास मनाई केली आहे. गेल्या महिन्यात ्बेस्टची सरासरी रोजची प्रवासी संख्या 25.1 लाख इतकी होती. त्यामुळे मंगळवारी ही संख्या साधारण पाच लाखाने घटल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.