
चेहऱ्यावरील मुरुम आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी महागडी कॉस्मेटिक उत्पादने लावूनही त्वचेच्या समस्या सुटत नाहीत. कारण या उत्पादनांमध्ये रसायने असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते. त्वचेच्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण आयुर्वेदिक उपायांचा घरच्या घरी वापर करू शकतो. आयुर्वेदात त्वचेच्या समस्या वात, पित्त आणि कफ दोषांमध्ये विभागल्या आहेत. वात म्हणजे कोरडी त्वचा, पित्त दोषाला तेलकट त्वचा म्हणतात. कफ दोष ही कोरडी आणि तेलकट त्वचेशी संबंधित समस्या आहे.
Beauty Tips – कोरियन ब्युटी सिक्रेट दडलंय आपल्याच किचनमध्ये, वाचा
चमेली आणि मुलतानी माती – चमेली मुरुमांची समस्या दूर ठेवण्यास मदत करते आणि मुलतानी माती तेलकट त्वचेवर रामबाण उपाय आहे.
हळद- हळदीमध्ये वात, पित्त, कफ असे तिन्ही दोष काढून टाकण्याचे गुणधर्म आहेत. हळद पावडरमध्ये कोणतेही आवश्यक तेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि नंतर तोंड पाण्याने धुवा. हा उपाय केल्यास टॅनिंग, मुरुमांची समस्या कमी होऊ शकते. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट वृद्धत्व आणि निस्तेज त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करते.
चंदन आणि दही मास्क- तेलकट त्वचा असेल तर चंदन आणि दही यांचे मिश्रण बनवा. हा फेस मास्क चेहऱ्यावर लावा. हे आपले छिद्र साफ करते आणि त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करते. हे त्वचेतील सेबम नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय मुरुमांपासूनही सुटका मिळते.
https://www.saamana.com/spend-just-rs-5-to-prevent-hair-loss/
कडुलिंब फेस पॅक -आयुर्वेदात कडुलिंबाला खूप महत्वाचे मानले जाते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. कडुनिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी सेप्टिक आणि अँटी फंगल गुणधर्म असतात जे त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. त्वचेवरील पुरळ आणि डाग दूर करण्यासाठी रोज कडुनिंबाचे पाणी प्या. याशिवाय कडुनिंबाचा साबण आणि स्क्रब वापरल्याने त्वचा निरोगी राहू शकते.
कोरफड- कोरफडीला आयुर्वेदात धृतकुमारी म्हणतात. कोरफडीचा वापर त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे सनबर्न आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते. दररोज कोरफड वापरल्याने त्वचा चमकदार आणि निर्दोष होऊ शकते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)