वयावरून बोलणाऱ्या चाहत्यांना भाग्यश्रीने सुनावलं, इन्टाग्रामवर केली पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांशी संवाद साधते. भाग्यश्रीने नुकतीच एक पोस्ट टाकली, ज्यामध्ये तिनं वयावरून काही लोकांना जबरदस्त चपराक लावली आहे. एवढंच नाही, भाग्यश्रीने आपले फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, हो मी 52 वर्षांची आहे आणि मला त्याचा गर्व देखील आहे. मी माझं वय एखाद्या पदकासारखे मानते, जपते. भाग्यश्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, तसेच चाहतेही मोठ्या प्रमाणावर या पोस्टवर कमेंट करत आहेत.

भाग्यश्री (Bhagyashree) फोटोमध्ये वर्कआउट ड्रेसमध्ये पाहायला मिळते. हो फोटो पोस्ट करत ती म्हणते, ” हो मी आहे मी 52 वर्षांची, आणि मला या गोष्टीचा गर्व आहे. मी आपल्या वयाला एका पदकासारखे घालून वावरते. मी स्वत:ला समाजासारखे का बदलू?, जसे ते 50 वर्षाच्या व्यक्तीची कल्पना तशी मी का होऊ? मी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिश्रम घेत आली आहे. जीवनात चढ-उतार येतात, पण तुम्ही त्याकाळात स्वत:ला कसे सांभाळता हे अधिक महत्त्वाचे आहे. मी नेहमी अशी नव्हतीच, मी बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत.”

भाग्यश्रीने (Bhagyashree) आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, “खाली पडा, पण पुन्हा उभे रहा. जखम झाल्यास ती भरून निघण्यावर लक्ष द्या, अयशस्वी असाल तरी प्रयत्न करणं सोडू नका. कारणं देऊ नका आणि आरोप तुम्हाल दुबळे बनवतात. कृतीतूनच हे सगळं होतं. उभे रहा, आपल्या मार्गावर चालत रहा. तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. तुम्हाला जे बनायचे आहे तशीच महिला बना.” भाग्यश्रीच्या या पोस्टला 21 हजाराहून अधिकवेळा लाइक करण्यात आलं आहे. लवकरच ती ‘राधेश्याम’ मध्ये दिसणार आहे.