नागपूरपाठोपाठ भंडाऱयातही कोरोनाचा हाहाकार, 24 तासांत उपराजधानीत 62 जणांचा मृत्यू

पूर्व विदर्भात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून रुग्णसंख्या रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. नागपूरपाठोपाठ भंडारा जिह्यातही आता कोरोनाची रुग्णसंख्या चांगलीच वाढीला लागली आहे. रविवारी नागपूर शहरात 3111 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर पूर्व विदर्भात हीच संख्या 6103 इतकी आहे.

भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱया दिवशी 800च्या वर रुग्णसंख्येची नोंद झाली. रविवारी भंडारा जिल्ह्यात 856 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मृत्युसंख्याही चांगलीच वाढीला लागली आहे. पूर्व विदर्भात आज 69 मृत्यूची नोंद करण्यात आली, त्यात 62 मृत्यू हे एकटय़ा नागपुरातील आहेत.

राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र रुग्णसंख्या व मृत्युसंख्या यात काहीच फरक पडताना दिसत नाही. रुग्णसंख्या कमी न होता रोज त्यात वाढ होत आहे. आज नागपूर शहरात 3111 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 1200 रुग्ण ग्रामीण भागातील तर 2906 शहरातील व 4 रुग्ण इतर जिह्यांतील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या