नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते! भास्कर जाधव यांनी घेतला समाचार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना भाजप खासदार नारायण राणे आणि राणे कुटुंबियांचा समाचार घेतला. नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते, असा टोला यावेळी भास्कर जाधव यांनी लगावला.

नारायण राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? तुम्ही तुमचा पक्ष काढला आणि एक वर्षात आपला पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भाजपच्या चिपळूणच्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांना इशारा का दिला? त्याचे उत्तर द्या. खरे तर नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते. परवाच्या दिवशी मंत्री असलेला नेपाळी वॉचमन सारखा दिसणारा पोरगा त्याने कोणत्या भाषेत माझ्यावर टीका केली? हे मंत्री भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली असते, अशा लोकांबद्दल पुन्हा मला विचारू नका, असे भास्कर जाधव म्हणाले.

नारायण राणेंना आत्ताच जर राज ठाकरेंवर प्रेम आलं असेल तर, 8 दिवसांपूर्वी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे. नारायण राणेंनी किंवा त्यांच्या मुलांनी राज ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलं, याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलं की, नारायण राणे हा एहसान फरामोश माणूस आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनी दिलेले उत्तर पुरेसे आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.

सरकारला मराठी लोकांनी नमवलं, आम्ही तुमच्या वतीनं…! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्र

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा

आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या वतीने आणि संमतीने विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा यासाठी माझं नाव देण्यात आलेलं आहे. आमच्या पक्षातर्फे आणि सहकारी पक्षाने देखील याला सहमती दर्शवली आहे. आम्ही तिन्ही पक्षातर्फे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आणि अध्यक्षांनाही भेटलो. परंतु अद्याप त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही. यापूर्वी जी अडचण सातत्याने सांगितली जात होती, एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के ज्या पदाची सदस्य संख्या असेल त्याच पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिलं जातं. असं जे सांगितलं जात होतं ते खरं नाही. हे आम्ही कायद्याने आणि नियमाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांकडून या पत्राचं उत्तरही घेतलेलं आहे. त्यामुळे सरकारने आणि अध्यक्षांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.

भारतीय जमवाजमव पक्षाच्या लोकांनी… हिंदी सक्तीवरून अंबादास दानवे यांचा जोरदार टोला