आरएसएसने इंग्रजांची चमचेगिरी केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priyanka-gandhi

सामना प्रतिनिधी। भटिंडा

जेव्हा संपूर्ण पंजाब इंग्रजांच्या विरोधात लढत होता तेव्हा आरएसएसच्या लोकांनी इंग्रजांची चमचेगिरी करण्यात धन्यता मानली. त्यांनी इंग्रजांचे नेहमीच समर्थन केले. प्रत्यक्षात संघाच्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यात कधीही सहभाग घेतला नाही, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. पंजाबच्या भटिंडा येथील प्रचारसभेत प्रियंका बोलत होत्या.

गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने काहीच केले नाही. जनतेला नेहमीच मोठी आश्वासने दिली, परंतु काहीच ठोस केले नाही. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली असून संरक्षण दलाच्या व्यवहारातही भाजप सरकारने घोटाळा केला. तसेच शेतकऱयांचीही फसवणूक केली, असा आरोप प्रियंका यांनी केला. पंजाबमध्ये अकाली सरकारने आपल्या कार्यकाळात काय केले हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच येथील लोकांनी विधानसभेतच भाजप आणि अकाली दल यांना उत्तर दिले होते. आज पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेसमोर एक संधी असून त्यांनी बदल होण्यासाठी भाजप सरकार उलथवून टाकावे, असे आवाहन जनतेला केले.