‘नशीबवान’ भाऊंची पडद्यामागची मेहनत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी ‘नशीबवान’ या चित्रपटात भाऊ कदम सफाई कर्मचार्‍याची भूमिका साकारत आहे. ही भूमिका खरी वाटावी, म्हणून भाऊने खरोखरच कचरा उचलून साफसफाई केली आहे. यात दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सफाई कामगार उचलतात तोच कचरा भाऊंना उचलण्यास सांगितले तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाची सफाई देखील करायला लावली. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे मुलुंड परिसरात झाले आहे. ‘नशीबवान’हा सिनेमा उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारीत असून, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 11 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची  प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, सिनेमाचे  निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे आहेत.