गुजरातची वृद्धा दादरमध्ये अडकली मुंबईत आली कशी तेच कळले नाही, भोईवाडा पोलीस मदतीला धावले

गुजरातच्या संस्कार नगरात राहणाऱया 75 वर्षीय वृद्धा घराबाहेर पडल्या आणि थेट दादर पूर्वेकडील एका पेट्रोल पंपजवळ सापडल्या. आपण गुजरातमध्येच आहोत अशाच भ्रमात त्या होत्या. सोबत असलेल्या बॅगेत दोन लाखांची रोकड होती. पण आपण नेमपं कुठे आहोत, इथे कसे आलो तेच त्यांना कळत नव्हते. त्या गोंधळलेल्या अवस्थेत असताना भोईवाडा पोलिसांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्या सुखरूप त्यांच्या मुलीकडे पोहचल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एका पेट्रोल पंपजवळ वृद्ध महिला गोंधळलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पीटर ऑपरेटर पाटील यांनी निर्भया पथकाला दिली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार तृप्ती चव्हाण, तेजस्विनी कांबळे आणि राखी रजपुत या त्या ठिकाणी पोहचल्या. त्यांनी वृद्ध महिलेस ताब्यात घेतले व विचारपूस केली असता महिलेने त्यांना त्यांचे नाव प्रमिलाबेन असे सांगितले व त्या संस्कार नगर येथे राहावयास आहेत, इतकेच सांगत होत्या. याशिवाय त्यांना बाकी काहीच सांगता येत नव्हते.

पोलिसांनी त्यांची बॅग तपासली असता बॅगेत दोन लाखांच्या आसपास रोख रक्कम अस्ताव्यस्त मिळून आली. तसेच अंधेरी, मीरा रोड, बोरिवली, मुंबई सेंट्रल येथील दोन-तीन दिवसांचे ट्रेनचे तिकीट मिळून आले. शिवाय पंजाब नॅशनल बँकेचे कच्छ गुजरात येथील पासबुक मिळून आले. त्यावरून समजले की सदरची महिला मूळची गुजरात येथे राहणारी आहे. आपण मुंबईत नाही तर गुजरातमध्येच असल्याचे वृद्धेला वाटत होते.
पुठ्ठय़ावर लिहिलेला नंबर कामी आला
तेजस्विनी कांबळे यांना प्रमिला यांच्या बॅगेत एक फाटलेला पुठ्ठा मिळून आला. त्यावर गुजरातीमध्ये नंबर लिहिला होता. त्या नंबरवरून माहिती काढत कांबळे यांनी अंधेरीत राहणाऱया प्रमिला बेन यांच्या मुलीचा मिता मेहता हिचा नंबर मिळवला. यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.
z आई एकटीच गुजरात येथे राहते. वयानुसार तिला काहीच आठवत नाही, काहीच लक्षात राहत नाही, तसेच ती सगळ्या गोष्टी विसरते. आई मुंबईपर्यंत कधी व कशी आली आहे हेच तिला माहिती नसल्याबाबत मिता यांनी सांगितले.