
सामना ऑनलाईन । भोपाळ
भोपाळ येथे मॉडेलला बंदी बनवणाऱ्या माथेफिरूला महिलांनी चपलेने चोपल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आरोपी त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं दिसत आहे.
भोपाळ येथे एका मॉडेलवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या राहुल सिंह या माथेफिरू तरुणाने शुक्रवारी तिला तिच्याच गरात बंदिस्त करून ठेवलं होतं. कशीबशी तिची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतल. शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. पण, कोर्टात नेण्यापूर्वी पोलिसांनी त्याला कोर्टाच्या रस्त्यावरून चालवत नेलं. त्यावेळी या प्रसंगाने संतापलेल्या महिलांनी राहुलला चपलेने चोपायला सुरुवात केली. पोलिसांच्या ताब्यात असूनही जमाव त्याच्यावर हल्ला करेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जे लोक राहुलवर संतापले होते, त्यांमध्ये महिलांचा सहभाग अधिक होता.
#WATCH: Women thrash the man who held a girl hostage in her house in Bhopal yesterday, claiming he loves her & wants to marry.The girl was later rescued & sent for medical treatment. #MadhyaPradesh pic.twitter.com/xDqwJSthoA
— ANI (@ANI) July 14, 2018
राहुल सिंह या माथेफिरू गेल्या चार महिन्यांपासून मॉडेलचा पाठलाग करत होता. तिच्याशी विवाह करण्याच्या जिद्दीपोटीच त्याने तिला तिच्याच घरात बंदिस्त केलं. अखेर पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली.






















































