राज्यात ३ सहाय्यक संचालकांसह १४६ सरकारी वकीलांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नांदेड

राज्यातील ३ सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता यांच्यासह १४६ सरकारी वकिलांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांनी जारी केले आहेत. सोबत २५ सरकारी वकीलांच्या विनंतीवरून बदल्या झाल्या आहेत. नांदेड येथील सहाय्यक अॅड.संचालक डोईफोडे यांच्यासह तीन सरकारी वकिलांच्या बदल्या झाल्या आहेत.

नांदेड येथील सहाय्यक संचालक अॅड.सखाराम डोईफोडे यांना नांदेड येथून पुणे येथे पाठविण्यात आले आहे. वाशिम येथील अॅड.सुरेश मुपीडवार यांना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. धुळे येथील अॅड.अनिल वळवी यांना अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. सोबतच राज्यातील १४६ सरकारी अभियोक्त्याच्या बदल्या जाहीर झाल्या आहेत. त्यात नांदेड येथून अॅड.विनोद शेवाळकर लातूर येथे जात आहेत.अॅड. मोहम्मद आमेर काझी यांची बदली औरंगाबाद येथे करण्यात आली. अॅड.मुस्ताक मोहम्मद गफार यांची बदली नांदेड येथून जालना येथे झाली आहे. नांदेड येथे येणारे सरकारी अभियोक्ता पुढील प्रमाणे आहेत. अॅड.अब्दुल खालेद अब्दुल हमीद, जालना (नांदेड), अॅड.सिमा दादाराव जोहीरे, बीड(नांदेड), अॅड.अशोक दत्तात्रय पोटे, लातूर (नांदेड), अॅड.शैलजा अनिल पाटील, परभणी (नांदेड), अॅड.अभय शिखरे हे गडचिरोली येथून नांदेडला येत आहेत. याशिवाय जालना येथील अॅड.गजानन चंद्रभान मंजा संभाजीनगरला जात आहेत. अॅड. समीर बेदरे बीड येथे जाणार आहेत. लातूर येथील अॅड.दिप्ती कुलकर्णी आणि अॅड. आरती निळेकर बीड येथे जाणार आहेत.

जालना येथे येणाऱ्या सरकारी वकिलांमध्ये कन्नड येथून अनिल येरेकर आणि संभाजीनगर येथून अॅड. अशिष दळे आणि अॅड.रमेश शिंदे यांचा समावेश आहे. नागपूरचे अॅड. शिवाजी कुलकर्णी परभणी येथे येणार आहेत. नाशिक येथून अॅड. रविंद्र पाटील संभाजी नगर येथे येणार आहेत. रायगडचे अॅड.सिध्देश्वर आंदळे लातूर येथे येणार आहेत. रत्नागिरी येथून अॅड. राणूदेवी रकटे धाराशिव येथे येणार आहेत. अहमदनगरचे अॅड.सुहास कुलकर्णी, आणि अॅड. शशांक ढोकरट संभाजीनगर येथे आणि अॅड.सीमा देशपांडे धाराशिव आणि अॅड. रविंद्र बोरसे ठाणे येथे जाणार आहेत.