दिल्लीत अग्नितांडव, पंडित दीनदयाल अंत्योदय भवनाला भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागली आहे. पंडित दीनदयाल अंत्योदय भवनाच्या 5 व्या मजल्यावर ही आग लागली असून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला भडकत आहेत. अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…