आयआयटी मुंबईने घेतली जगातील सर्वात मोठी हार्डवेअर कार्यशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात मोठी हार्डवेअर कार्यशाळा पवईच्या आयआयटी मुंबईच्या वतीने नुकतीच आयोजित करण्यात आली होती. साडेतीन हजारांपेक्षा अधिक महाविद्यालयांमधील शिक्षकांना या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. देशभरातील 120 पेक्षा अधिक केंद्रांमध्ये ही कार्यशाळा झाली. त्यातील एक केंद्र म्यानमारमध्येही होते. या कार्यशाळेसाठी ‘ई-सिम’ या विनामूल्य सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला.

शिक्षकांना हार्डवेअर तंत्रज्ञान शिकवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली जगातील अशा प्रकारची ही पहिलीच कार्यशाळा होती. या कार्यशाळेत सहभागी झालेले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हे हार्डवेअर तंत्रज्ञान शिकवणार आहेत. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळवता येईल इतके सक्षम बनवणे हा यामागचा उद्देश आहे.

आयआयटी मुंबईच्या आयसीटी केंद्रातील प्रमुख संशोधक प्रा. कन्नन मुदगालय यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक स्कील्स सेक्टर कौन्सिलचे मुख्याधिकारी एन. के. मोहपात्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. प्रमोद मुरली यांनी या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.