उच्च जातीतील तरुणीसोबत पळून गेला, पंचायतीने दलित तरुणाला प्यायला लावले मूत्र

बिहारमधील गया जिल्ह्यात एका दलित तरुणाला उच्च जातीतील तरुणीसोबत पळून गेला म्हणून पंचायतीने मूत्र प्यायला लावल्याची शिक्षा दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचायतीच्या सहा सदस्यांना अटक केली आहे.

गया मधील वाझिरगंज भागात एका दलित तरुणाचे उच्च जातीतील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्या प्रेमाला तरुणीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ते दोघे लग्न करण्यासाठी पळून गेलेले. मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी त्या दोघांना शोधून काढले व परत गावात आणले. त्यानंतर त्या तरुणाला पंचायतीसमोर हजर केले. त्यावेळी पंचायत सदस्यांनी त्या तरुणाला थुंकी चाटण्याची व मूत्र पिण्याची शिक्षा दिली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये पंचायतीचे सदस्य जमिनीवर थुंकताना दिसत असून तो तरुण त्यांची थुंकी चाटताना दिसत आहे. त्यानंतर पंचायत समितीच्या सदस्यांनी त्याला एका बॉटलमध्ये भरून आणलेले मूत्र देखील प्यायला लावले. या घटनेचा व्हि़डीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखव केली

आपली प्रतिक्रिया द्या