बिहार- अल्पवयीन दिव्यांग मुलीवर दोघांचा सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात दोन विकृतांनी एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना नालंदा जिल्ह्यातील सिलाव येथे घडली आहे. या तरुणांनी तिची यापूर्वीही छेड काढली होती. हिंमत वाढल्याने त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून बरनौसा गावात राहणाऱ्या संतोष सिंह याला अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू करण्यात आला असून संतोष याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिक जनतेत संतापाचं वातावरण असून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.