
पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणीत एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. त्यानुसार नितीश कुमार यांचा जेडीयू सर्वाधिक 101 जागा लढणार आहे. भाजपने पुन्हा नमते घेत छोट्या भावाची भूमिका स्वीकारली असून 100 जागांवर समाधान मानले आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 110 जागा लढवणाऱया भाजपने 78 जागा जिंकल्या होत्या, तर 115 जागा लढणाऱया जेडीयूला केवळ 43 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल असे मानले जात होते. प्रत्यक्षात भाजपने 10 जागांवर पाणी सोडले आहे. तर, जेडीयू मागील वेळेपेक्षा 14 जागा कमी लढणार आहे. लोकजनशक्ती (आर) पक्षाला 29, हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 7 आणि राष्ट्रीय लोकमोर्चाला 6 जागा देण्यात आल्या आहेत.