बिहारमध्ये घासून की ठासून? एनडीए आणि महागठबंधन यांच्यात जोरदार चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यंत चुरशीच्या झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद निकालातही उमटले. दरतासाला जदयू-भाजपची ‘एनडीए’ आणि राजद-काँग्रेस-डाव्या पक्षांचे ‘महागठबंधन’ यांच्यात ‘टफ फाइट’ पाहायला मिळत आहे. या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे, जदयू तिसऱया क्रमांकावर फेकला गेला आहे. तर भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे एकहाती महागठबंधनची लढाई लढणारे तेजस्वी यादव यांच्या रूपाने बिहारला नवा नेता मिळाला असून, निकाल काहीही लागो; तेजस्वी हेच ‘मॅन ऑफ दी मॅच’ ठरले आहेत. भाजप आणि राजद यांच्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्यासाठी जोरदार चुरस सुरू आहे. कोरोनामुळे मतमोजणी रात्री उशीरापर्यंत संथ गतीने सुरु होती. एनडीए की महागठबंधन? बहुमत घासून मिळेल की दणदणीत ठासून विजय मिळेल? याकरिता अंतिम निकालासाठी उद्या सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. दरम्यान, एनडीए आणि महागठबंधन या दोघांनीही सरकार आम्हीच स्थापन करणार असा दावा रात्री उशीरा केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात होणाऱया बिहार विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. 243 मतदारसंघांत आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. 55 ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीपासून एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, निवडणूक आयोगाने रात्री 11 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 124 तर महागठबंधन 111 जागांवर आघाडीवर आहेत. बहुमतासाठी 124 ही मॅजिक फिगर आहे.

कोरोनामुळे मतमोजणी संथ गतीने

  • ‘ईव्हीएम’मुळे दुपारपर्यंत कल स्पष्ट होतो आणि सायंकाळी पाच-सहापर्यंत बहुतांशी मतदारसंघांचा निकाल लागलेला असतो. परंतु यावेळी कोरोना महामारीमुळे वेगळी परिस्थिती आहे. कोरोनाचे नियम पाळून मतमोजणी होत असल्यामुळे त्याची गती संथ आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत ही मतमोजणी सुरू राहील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
  • बिहारमध्ये 243 मतदारसंघांत सरासरी 57.09 टक्के मतदान झाले. सुमारे 7 कोटी 3 लाख मतदारांपैकी 4 कोटी 16 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.

तेजस्वी यांची लढत तरुणांसाठी प्रेरणादायी

‘एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते, तर दुसऱया बाजूला तेजस्वी यांच्यासारखा तरुण नेता होता. तेजस्वी यांनी पहिल्याच निवडणुकीत दिलेली लढत आणि मिळवलेल्या जागा हे चांगले यश आहे. यातून तरुणांना प्रेरणा मिळेल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सांगितले. ‘बिहारमध्ये आम्ही पक्ष म्हणून जास्त लक्ष घातले नाही. खरी लढत ही नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्येच होती. तेजस्वी यांनी चांगल्या प्रकारे लढत दिली आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल.’ दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्याचा दावा केला जातोय. त्याबद्दल शरद पवार यांना विचारले असता, ‘आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती, ती आणून दिल्याबद्दल धन्यवाद!’ असा टोला त्यांनी लगाविला.

राजद सर्वात मोठा पक्ष

  • ‘एनडीए’साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार, पेंद्रातील एक झडन मंत्री निवडणूक प्रचारात उतरले होते. मात्र, ‘महागठबंधन’साठी राजद अध्यक्ष 31 वर्षीय तेजस्वी यादव यांनी एकहाती प्रचार केला. दिवसाला 10-12 सभा घेतल्या. त्यांच्यामुळे महागठबंधनला चमकदार कामगिरी करता आली.
  • रात्री अकरापर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महागठबंधनला 111 जागा मिळाल्या आहेत. त्यात तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दलने (राजद) 60 जागांवर विजय मिळविला असून, 16 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे राजदच्या जागा 76, काँग्रेस पक्ष 19 आणि डावे पक्ष 16 जागांवर विजयी किंवा आघाडीवर आहेत.

चिराग पासवान यांना भाजपने वेगळे करायला हवे होते – जदयत

कोरोना आणि चिराग पासवान यांच्यामुळेच जदयूची कामगिरी खराब झाल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या टीमने म्हटले आहे. चिराग पासवान सुरुवातीपासून प्रचारात सातत्याने नितीश कुमारांवर टीका करीत होते. ‘एनडीएचे घटक असलेल्या चिराग यांना भाजपने रोखायला हवे होते. भाजपने सुरुवातीलाच चिराग यांना वेगळे करायला हवे होते,’ अशी स्पष्ट भूमिका जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी मांडली आहे.

चिराग पासवान यांच्या लोजपाला एक जागा

मुख्यमंत्री नितीश कुमार नकोत म्हणून बिहार निवडणुकीत ‘एनडीए’तून बाहेर पडलेले दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या ‘लोजपा’ला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. लोजपाला केवळ एकच जागा मिळाली आहे. 2015मध्ये दोन जागा होत्या.

नितिशकुमारांच्या घरी भाजप नेते

बिहारमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले असून, भाजप नेते सुशिलकुमार मोदी, भुपेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री नितिशकुमार यांची भेट घेतली. दरम्यान, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी पह्नवर नितिशकुमारांशी चर्चा केली आहे. आणखी काही दिवस भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र सुरू राहील.

40 वर मतदारसंघांत दोन उमेदवारांच्या मतांमध्ये केवळ एक हजाराचा फरक

ही निवडणूक एनडीए आणि महागठबंधन यांच्यात चुरशीची झाल्याचे स्पष्ट आहे. 40वर मतदारसंघांमध्ये दोन उमेदवारांमध्ये केवळ एक हजार मतांचा फरक आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीचा कल बदलू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
जदयूला फटका;

भाजपला जास्त जागा

  • या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे, पहिल्यांदा बिहारमध्ये भाजपला फायदा झाला आहे. तर जदयूला मोठा फटका बसला आहे.
  • निवडणूक आयोगाने रात्री अकरापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एनडीएला 124 जागा मिळताना दिसत आहेत. त्यात भाजप 51 जागांवर विजयी झाली असून, 22 जागांवर आघाडीवर आहे. जदयू 32 जागांवर विजयी झाली असून, 11 जागांवर आघाडीवर आहे. जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चाला 4 तर विकसनशील पार्टीचे उमेवार 4 जागांवर विजयी झाले आहेत. एनडीएला 124 जागा मिळाल्याचा काैल आहे.
  • राजदने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर 119 उमेदवारांची यादी दिली आहे. या 119 मतदारसंघात मतमोजणी पूर्ण झाली आहे. हे उमेदवार विजयी झाले आहे. रिटर्निंग अधिकाऱयांनी उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या; परंतु आता मात्र ते सर्टिफिकेट देत नाहीत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही हे उमेदवार विजयी घोषित केले आहेत. नितिशकुमार अधिकाऱयांना पह्न करून दबाव टाकत आहेत. आमच्या विजयी उमेदवारांना पराभूत करा, असे सांगत आहेत. ही लोकशाहीची लुटालूट असून, हे खपवून घेणार नाही, असे राजदने ट्विटमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात राजद आणि काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांची भेट घेऊन तक्रार केली आहे.

‘एमआयएम’ पाच जागांवर

खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाला चार जागा मिळाली असून, एक जागांवर आघाडीवर आहे. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे.

नितिशकुमार यांच्याकडून मतमोजणीत फेरफार; राजदचा आरोप

मतमोजणी पूर्ण होऊन महागठबंधनचे 119 उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री नितिशकुमार अधिकाऱयांवर दबाव टाकून मतमोजणीत फेरफार करीत आहेत. विजयी उमेदवारांना सर्टिफिकेट दिले जात नाही. आमच्या विजयी उमेदवारांना पराभूत केले जात आहे, असा गंभीर आरोप राजदने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एनडीएचे अभिनंदन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएचे अभिनंदन केले आहे. बिहारमधील जनतेने विकास आणि फक्त विकासालाच मतदान केले म्हणूनच एनडीए विजयी झाली, असे मोदींनी म्हटले आहे.

भाजप 73
जदयू 43
राजद 76
काँग्रेस 19
डावे पक्ष 16
इतर व अपक्ष 16