
पाटणा ः
बिहारमध्ये पेढय़ांची लाच मागणाऱया एका पोलीस अधिकाऱयाला निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये ही घटना घडली आहे. एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने लाच म्हणून चक्क एक किलो पेढय़ांची मागणी केली. याच प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पोलीस अधिकाऱयाला निलंबित करण्यात आले आहे.
वाहन तपासणीसंदर्भातील या प्रकरणामध्ये एएसआय असणारे भोला राय हे दोषी आढळून आले आहेत. वाहन तपासणीदरम्यान प्रदूषणासंदर्भातील कागदपत्रं नसल्याने भोला यांनी हिंदुस्थानी हवाई दलातील माजी कर्मचाऱयाकडे लाच मागितली. पैशांऐवजी एक किलो पेढे देण्याची मागणी भोला यांनी केली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत पोहचला तेव्हा भोला यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


























































