
पुणे शहरातील मध्यवर्ती खडक पोलीस ठाण्यालगत असलेल्या शुक्रवार पेठेतील सुभाषनगर गल्लीतून दुचाकी चोरणाऱ्य़ाला खडक पोलिसांनी येरवड्यातून अटक केले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गणेश शंकर कानडे (वय 31, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शुक्रवार पेठेतील सुभाषनगरमधील घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी खडक पोलिसांकडून तपास सुरू असताना, दुचाकी चोरटा येरवडा परिसरात असल्याची माहिती पोलीस शिपाई हिंमत होळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गणेश कानडे याला अटक केले. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, विठ्ठल पाटील, शरद पवार, हिंमत होळकर, किरण शितोळे यांच्या पथकाने केली.
























































