पारनेर तालुक्यातील खडकवाडी-बोरवाक रस्त्याचे काम न करताच बिल अदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पारनेर तालुक्यातील खडकवाडी-बोरवाक रस्त्याचे काम न करता बील काढणार्‍या अधिकार्‍यांसह ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांनी ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले. सदर रस्त्याच्या कामात आधी निवेदन देवूनही प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने दाते यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.

रस्त्याच्या बोगस कामाच्या प्रकरणात दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, ठेकेदाराला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकावे, निविदेतील तरतुदीप्रमाणे रस्त्याचे काम करून द्यावे, खडकवाडी, जांभळवाडी व कारेगाव जोडरस्त्याच्या कामांची चौकशी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात संजय चिकणे, वामन चिकणे, ज्ञानदेव गागरे, अमोल रोकडे, धनंजय ढोकळे, पंढरीनाथ चिकणे, साहेबराव चिकणे, नामदेव चिकणे, विलास चिकणे, रवींद्र चिकणे, रतन चिकणे, अर्जुन चिकणे, गोरक्ष चिकणे, अर्जुन केदार, गंगाराम पारधे, पप्पू केदार आदींसह खडकवाडी ग्रामस्थ सहभागी झाले होते.