‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-narendra-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिली आहे. ही सुनावणी येत्या 8 एप्रिलला न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे होणार आहे. त्यामुळे ‘पीएम नरेंद्र मोदी’ या हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. शुक्रवार, 5 एप्रिल या नियोजित तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असे चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी स्पष्ट केले आहे. मात्र प्रदर्शनाची पुढील तारीख त्यांनी सांगितलेली नाही. लवकरच ती कळविण्यात येईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.