गुन्हेगारांसोबत ‘बर्थ डे’: शिवडीचा पोलीस शिपाई कापसे निलंबित, गंभीर दखल घेत सेवेतून निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा करणे, रक्तदान शिबिरात त्यांच्यासोबत फोटो काढून समाजमाध्यमातून प्रसारित करणे तसेच खासगी गाडीत पिस्तूल घेऊन काढलेले फोटो व्हॉटस्अॅपवर डीपी ठेवणे शिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई हेमंत कापसे यांना चांगलेच भोवले. बंदर परिमंडळाच्या उपायुक्तांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. कापसे यांनी दाखलेबाज गुन्हेगार सुरेश हरिजन, राजेश सुधाकर राव आणि संजय लहाने यांना बोलावून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला. रक्तदान शिबिराला उपस्थित राहून त्यांच्यासोबत फोटोदेखील काढले आणि ते फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केले. याव्यतिरिक्त कापसे कॉम्बॅक्ट वाहनावर कर्तव्यावर असताना त्यांना दिलेले पिस्तूल घेऊन त्यांनी खासगी गाडीत फोटो काढले. मग ते फोटो व्हॉटस्अपच्या डीपीवर ठेवले. कापसे यांचे असे वर्तन गंभीर स्वरूपाचे असून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारी असल्याने बंदर परिमंडळाच्या उपायुक्तांनी याची दखल घेत कापसे यांना सेवेतून निलंबित केले आहे.