खोटे आश्वासन देऊन भाजपने गद्दारी केली

गेली 20 वर्षे माझ्या आई आणि वडिलांनी भाजपसोबत काम केले. यंदाच्या निवडणुकीत तिकीट दिले जाईल, असे आम्हाला खोटे आश्वासन देण्यात आले, असा गंभीर आरोप प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर पूजा धात्रक हिने केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 28 डिसेंबरला फोन आला की, आई-वडील अशा दोघांना तिकिटे मिळणार आहेत, त्यामुळे एबी फॉर्म भरायची तयारी ठेवा. 29 डिसेंबरला आमच्याकडून सर्व तयारी झाली होती. दिवसभर आम्ही तिकिटाची प्रतीक्षा करत होतो. रात्री उशिरा 12 वाजेच्या सुमारास आम्हाला समजले की, आम्हाला तिकीटच मिळणार नाही. भाजपच्या नेत्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली. यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी आम्ही मनसेकडून अर्ज भरला, असे पूजाने सांगितले.