विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका- चित्रा वाघ

442

वीस वर्षे मी तिकडे (बारामती)कडे होते. त्यामुळे तेथील मला माहिती आहे. आपल्याच माणसाला सुखदुःख कळतात. या लोकशाहीच्या मोठ्या उत्सावात विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या भावाने (पालकमंत्री राम शिंदे) यांनी पाच वर्षांत मतदारसंघात विविध विकास कामे केली. त्यांची उतराई म्हणून, भावाला आता मताच्या रूपाने वर्षाव करा. बारामतीकरांकडे सोन्याच्या वीटा आहेत पण त्या आपल्या काहीही कामाच्या नाहीत आपल्या परिसराचा विकास करणार्‍या राम शिंदेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहा असे आवाहन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष व महिला अर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी नान्नज येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित मेळाव्यात भाजपा महिला उपाध्यक्ष चित्राताई वाघ बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, सरपंच विद्याताई मोहळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, पंचायत समितीच्या सदस्या मनिषा सुरवसे, माजी नगराध्यक्ष अर्चना राळेभात, धनलक्ष्मी हजारे, मायाताई आव्हाड, दिपाली गर्जे, हिनाभाभी आदी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या, लंकेत ( बारामती) सोन्याच्या विटा आहेत पण ते तुमच्या कामाचे नाहीत. म्हणून मग तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे पाच वर्षे पालकमंत्री राम शिंदे यांनी विकासकामे करून मते मागत आहेत यांनी काय काम केले असा सवाल चित्राताई वाघ यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या देशात 50 टक्के महिला आहेत. हिंदू महिलाबाबत जसे कायदे आहेत त्याचप्रमाणे मुस्लिम महिलांना न्याय मिळावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक कायदा मंजूर करून न्याय दिला.

तसेच महिलांच्या डोक्यावरील सरपणाचे ओझे कमी करून उज्ज्वला गॅस योजनेद्वारे शंभर रूपयात गॅस कनेक्शन देऊन प्रत्येक कुटुंब चुलमुक्त व धूरमुक्त केले यामुळे महिलांच्या जीवनात परिवर्तन झाले असून त्यांना वेळ मिळाला आहे. या मिळालेल्या वेळेत तात्पुरता गृहउद्योग न करता महिलांना दररोज काम मिळेल. यासाठी महिला बचतगटांमार्फत उद्योग उभारला जाईल. त्यासाठी महीला अर्थिक विकास महामंडळामार्फत भांडवल उपलब्ध करून, उद्योगाबाबत शिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक पंचायत समिती गणात एक उद्योग उभारला जाईल अशी ग्वाही चित्राताई वाघ यांनी दिली.

यावेळी बोलतांना आशाताई शिंदे म्हणाल्या, घराणेशाही विरूद्ध लोकशाही अशी निवडणूक आहे. या गणातून मी पंचायत समितीला जिल्ह्य़ात प्रथम क्रमांकाने निवडूण आले. मंत्री शिंदे यांच्या पाठीमागे वारस कोणी तयार केले नाही. आईवडील वयोवृद्ध आहेत. मी घरकाम व मुलगा लहान आहे यामुळे आमचे कुटुंब तुम्ही आहात तुम्ही आमचे नातेवाईक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या