
उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार कब्रिस्तानच्या जमिनीसाठी पैसे खर्च करत नाहिये, तर मंदिरासाठी पैसे खर्च करत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. राम कथा पार्कमध्ये उत्तर प्रदेश सरकारने भव्य दिपोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाअले की, “कोरोना काळात गरीबांना मोफत अन्न धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत होती. त्याचा अवधी वाढवून ती मार्चपर्यंत करण्यात आली आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यामुळेच आगा गरीबांना धान्यासह मीठ, साखर, डाळ आणि तेलही मिळेल असे योगी म्हणाले.
पूर्वी राज्याचे पैसे कब्रिस्तानासाठी खर्च व्हायचे. आता मंदिरांच्या कमासाठी राज्याचे पैसे खर्च होत आहे असे योगी म्हणाले. तसेच हा विचारांचा फरक आहे. ज्यांना कब्रिस्तानाबाबत आपुलकी होती तेव्हा तिकडे पैसे खर्च होत होते. ज्यांना धर्म आणि संस्कृतीबद्दल प्रेम आहे ते लोक गरीबांच्या प्रगीसाठी काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.



























































