भाजपने राज्यघटनेची हत्या केली, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याची शिफारस केली. यामुळे जम्मू कश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल. तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. अमित शहा यांनी ही शिफारस मांडताच राज्यसभेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला. यावेळी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपाने राज्यघटनेची हत्या केल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत टीका करताना भाजपने राज्यघटनेची हत्या केल्याचं म्हटले आहे. ‘आमचा राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. राज्यघटनेची सुरक्षा करण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू. पण भाजपने राज्यघटनेची हत्या केली आहे’, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.