मत द्या, पुद्दुचेरीतील बेरोजगारी 40 टक्के कमी करू! अमित शहा यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मत देऊन सत्तेवर आणा आम्ही केंद्रशासित पुद्दुचेरीतील युवकांची बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करू, असा दावा पेंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शहा यांनी कराइकल येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना आज केला. सत्तेवर असणाऱया काँग्रेस सरकारने केंद्राच्या लोकोपयोगी योजना राबवण्यात केलेली दिरंगाई आणि तुच्छ राजकारणच राज्याच्या विकासातील मुख्य अडथळा ठरल्याचा आरोपही शहा यांनी यावेळी केला.

पुद्दुचेरीत पुढचे सरकार हे एनडीएचे असेल. केवळ पुद्दुचेरीतच नव्हे समस्त हिंदुस्थानात काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत. कारण काँग्रेसमध्ये योग्यतेच्या नेत्यांची वानवा आता जाणवू लागल्याची बोचरी टीका गृहमंत्री शहा यांनी केली. आता होणाऱया राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून देत राज्याच्या विकासाला गती द्या, असेही आवाहन त्यांनी केले.

केंद्रात मत्स्योद्योग मंत्रालय दोन वर्षांपूर्वीच अस्तित्वात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशात मच्छीमार बांधवांच्या हितासाठी वेगळे केंद्रात वेगळे मत्स्योद्योग मंत्रालय अस्तित्वात आहे याची खबरच नाहीय, असा आरोप करून अमित शहा यांनी तुम्हाला असा अनभिज्ञ नेता हवाय का, असा सवाल प्रचारसभेला उपस्थित मतदारांना केला. पेंद्रात 2019 पासून वेगळे मत्स्योद्योग मंत्रालय अस्तित्वात आलेले आहे. कदाचित राहुल भैया त्यावेळी सुट्टीवर गेले असतील म्हणून त्यांना असे वेगळे मंत्रालय असल्याची खबरही नसेल, अशी टीका शहा यांनी या सभेत बोलताना केली.