
परळी तालुक्यात गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, लोकप्रतिनिधी व अनेक पदे भूषवणारे जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. केज येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा ध्वज हाती घेऊन हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. प्रवेशावेळी विधानसभा संघटक राजभैया पांडे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, रोहयो समिती सदस्य संजय फड, पंडित गुट्टे, शहर अधिकारी कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, तुकाराम अप्पा नरवाडे, अजय आवाड आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवाजी शिंदे यांनी मरेपर्यंत शिवसेनेत काम करणार असल्याचे सांगितले. शिंदे यांच्या प्रवेशाने परळी मतदार संघातील ग्रामीण भागात शिवसेनेला बळकटी भेटणार असल्याचे बोलले जात आहे.
























































