
मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याच्या गुह्यात आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्यासमोर जबाब नोंदवला. तब्बल पाच तास त्यांची चौकशी सुरू होती.
मायणी येथील मृत भिसे यांची बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चौघांवर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळ्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

























































