बकरी ईद बोकडांविना साजरी केली जाईल, तेव्हा दिवाळी फटाक्यांविना साजरी करू – भाजप खासदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतत वाद ओढवून घेणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषण बद्दल बोलणाऱ्यांना उद्देशून खासदार साक्षी महाराज यांनी फेसबुक पेजवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की, ‘ज्यावर्षी बकरी ईद बोकडांविना साजरी केली जाईल, तेव्हा दिवाळी फटाक्यांविना साजरी करू.’

फटाक्यांवरून जास्त ज्ञान पाजळू नका

साक्षी महाराज यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या त्यांच्या दिल्ली येथील घरात कॉरन्टाईन आहेत. याआधीही त्यांनी असे अनेक वादग्रस्त विधान केले आहेत. घरात कॉरन्टाईन असतानाच त्यांनी बकरी ईद आणि दिवाळीची तुलना करणारी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. ‘प्रदूषणाच्या नावाखाली फटाक्यांवर जास्त ज्ञान पाजळू नका’, असेही ते म्हणाले आहेत.