भाजप खासदाराला हवी घटनेत दुरुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य घटनेच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ हा शब्द हटवून तिथे ‘न्याय्य’ शब्दाचा वापर करावा यासाठी घटनेत दुरुस्ती करण्यास भाजपा खासदार के. जे. अल्फोन्स यांनी मांडलेल्या विधेयकावरून शुक्रवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षातील खासदारांनी त्या विधेयकाला आक्षेप घेतला. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार प्रा. मनोज कुमार यांनी राज्य घटनेच्या प्रस्तावनेत बदल करणे म्हणजे घटनेवर हल्ला केल्यासारखे आहे असे सांगत विधेयकाला विरोध केला. त्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश यांनी विधेयकावरील आपला निर्णय राखून ठेवला.