हातात चॉकलेट, डोक्यावर टोपी; भाजप खासदारांचा ‘Modi-fied’ अवतार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
new-look-bjp-mp

दिल्लीत भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी पक्षाचे सर्व खासदार नव्या अवतारात दिसले आहेत. खरे तर चार राज्यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये केलेल्या रोड शो वेळी नवीन डिझाइन केलेली टोपी घातली होती. आता ही टोपी सर्व खासदार आणि मंत्र्यांना वाटण्यात आली आहे. एवढेच नाही तर भाजप खासदारांना खास चॉकलेट्सही देण्यात आली आहेत. ज्यावर पीएम मोदींचा फोटो छापलेला आहे. चार राज्यांतील निवडणुकीतील विजयानंतर भाजप पूर्णपणे वेगळ्या शैलीत दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांना वाटण्यात येणारी टोपी गुजरात भाजपने तयार केली आहे. पक्षश्रेष्ठींना ही टोपी खूप आवडली आहे. यानंतर दिल्लीतील भाजप संसदीय पक्षाने या टोपी आणि एनर्जी बूस्टर चॉकलेट्सची ऑर्डर दिली.

या सर्व टोप्या सुमारे 400 खासदारांना वाटण्यात आल्या. आता पक्षाचे खासदार या टोप्या घालून फिरत आहेत आणि एनर्जी बूस्टर चॉकलेट खाताना दिसत आहेत.