भाजपची तिसरी यादी जाहीर, पाच बडे नेते वेटिंगवरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. तिसऱ्या यादीमध्ये भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे, प्रकाश मेहता यांचे नाव नाही.

कोणाला तिकीट द्यायचे हे सांगणार नाही, पक्षाचा निर्णय मान्य! एकनाथ खडसे

भाजपने आतापर्यंत 143 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीमध्ये 125, दुसऱ्या यादीमध्ये 14 आणि तिसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने अद्यापही पाच बडे नेते वेटिंगवर ठेवले आहेत. यातील तिघांना अजूनही उमेदवारी मिळण्याची संधी आहे, परंतु दोघांची तिकीटे मात्र कापली जाणार आहेत.

भाजपची दुसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही

तिसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे –

रामटेक – मल्लिकार्जून रेड्डी
मालाड पश्चिम – रमेश ठाकूर
शिरपूर – काशिराम पावरा
साकोली – परिणय फुके

Live – भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री इथून लढणार