सुसंवाद कसा राखायचा; भाजप देणार ट्रेनिंग

‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगाला देणाऱया कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह करणाऱ्या विजय शाह आणि संपूर्ण हिंदुस्थानी लष्कर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नतमस्तक झाले असे विधान करणाऱया मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्यामुळे भाजपची मान शरमेने खाली गेली. त्यानंतर पक्षात आणखी कुणी वाचाळवीर बनू नये म्हणून भाजपने लोकांशी सुसंवाद कसा राखायचा, कुठे काय बोलायचे, काय बोलायचे नाही याबद्दल पक्षातील नेत्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय मध्य प्रदेश भाजपने घेतला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे पक्षात तणाव वाढला आहे.