कुडाळ तालुक्यातील पिंगुळीत भाजपला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. जि.प.चे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे सांगितले.

शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये पिंगुळी येथील प्रकाश गावडे, कपिल म्हापसेकर, नारायण नेमन, चेतन राऊळ, दत्तगुरू राऊळ, रूपेश धुरी, सतीश राऊळ, दिनेश पिंगूळकर, प्रवीण धुरी, प्रसाद प्रभू, बाबली नेमन, जयराम धुरी, किरण म्हापसेकर यांचा समावेश आहे. पक्षात आलेल्या सर्वांना शिवसेनेत मानसन्मान दिला जाईल असे नाईक यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, संतोष शिरसाट, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, सरपंच निर्मला पालकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या