बीडच्या चातुर्मासात 75 भक्तांचे रक्तदान

54

सामना प्रतिनिधी । बीड

प. पु. माधवानंद महाराज उमरखेड यांचा बीडमध्ये मंगळवारपासून चातुर्मासारंभ झाला आहे. त्यानिमित्त गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रक्तदान शिबिरात 75 भक्तांनी रक्तदान केले.

60 दिवस बीडमध्ये हा चातुर्मास सुरू राहणार आहे. आज सुरू झालेल्या चातुर्मासामध्ये राज्यभरातील भक्तांनी उपस्थिती दर्शवली. गुरूंच्या जयघोषात पौर्णिमा साजरी झाली. आज या पोर्णिमेनिमित्त चातुर्मास स्थळी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. माधवानंद महाराजाची 71 वी सध्या सुरू आहे. या धार्मिक उत्सवात समाजकार्य करून भक्तांनी धार्मिकतेला सामाजिक स्वरूप दिले. अतिशय उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या