पूजा महाडेश्वरांचा दणदणीत विजय, भाजपला जोरदार झटका

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पश्चात पत्नी पूजा महाडेश्वर यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड कायम ठेवत भाजपला चांगलेच लोळवले. प्रभाग क्रमांक 87मधून पूजा महाडेश्वर यांचा 11 हजार 588 मतांनी विजय झाला.

भाजपचे उमेदवार महेश पारकर यांना पराभूत करत पूजा महाडेश्वर यांनी दणदणीत विजय मिळवला. 2017च्या निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांनी पारकर यांचा पराभव केला होता.

2023मध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाले. पालिका निवडणुकीत त्यांची पत्नी पूजा यांना संधी देण्यात आली. 2012मध्ये त्या नगरसेवक होत्या. या प्रभागात दोनदा नगरसेवक राहिलेल्या पारकर यांचा पूजा महाडेश्वर यांनी दारुण पराभव केला.

या दोन्ही उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क असल्याने या प्रभागात काटे की टक्कर झाली होती. मात्र पूजा महाडेश्वर यांनी पारकर यांच्यावर 2412 मतांनी विजय मिळवला. पारकर यांना 9 हजार 160 मते मिळाली.

दादरचा शिवसेनेचा गड बुलंद राहिला! दादरमध्ये गद्दारांना पाणी पाजले, धारावीकरांची मशालीला साथ

आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई प्रचारात

विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाने या प्रभागातील निवडणूक शिवसेनेसाठी भावनिक होती. पूजा महाडेश्वर यांच्या प्रचारासाठी आमदार आदित्य ठाकरे उतरले होते. आमदार वरुण सरदेसाई यांनी पूजा महाडेश्वर यांच्या विजयासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता.