बारा वर्षांवरील दहा लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज! नायरमध्ये 15 मुलांवरील ट्रायल यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक ‘झायकोव्ह-डी’ लसीचे डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पालिकेनेही बारा वर्षांवरील दहा लाख मुलांच्या लसीकरणासाठी तयारी केली आहे. पालिकेच्या नायर रुग्णालयात 2 ते 18 वर्षांवरील 15 मुलांवर केलेली ट्रायल यशस्वी ठरली असून केंद्राने निर्देश दिल्यास तीन दिवसांत लसीकरण सुरू करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पालिकेच्या माध्यमातून मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1 कोटी 42 लाख 62 हजार 513 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 88 लाख 98 हजार 758 पहिला डोस तर 53 लाख 63 हजार 755 डोस देण्यात आले आहेत. दिवाळीत चार दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत पाच लाख डोस उपलब्ध आहेत. पालिका, सरकारी आणि खासगी मिळून मुंबईत सध्या 463 लसीकरण पेंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. दिवसाला 50 हजार ते एक लाखावर डोस देण्यात येत आहेत.

असे आहे नियोजन

  • लहान मुलांना सुईने नाही तर ‘जेट ऑप्लिकेटर’च्या सहाय्याने देण्यात येईल.
  • यासाठी पालिका आपल्या कर्मचाऱयांना विशेष ट्रेनिंग देईल.
  • 28 दिवसांच्या अंतराने तीन डोस दिले जातील.
  • केंद्राच्या निर्णयानुसार एका डोसची किंमत सुमारे 358 रुपये असेल. सध्याच्या लसीकरण केंद्रांवर मुलांसाठी विशेष बूथ असेल.