पुन्हा नोकरीवर घ्या, किमान वेतन द्या, अन्यथा आमरण उपोषण!

33
strike

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे आणि किमान वेतन द्यावे या मागणीसाठी आज सलग अठराव्या दिवशी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. याबाबत सोमवारी तोडगा निघाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या कामगारांनी युनियन स्थापन केली म्हणून 18 कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा आरोपही आंदोलकर्त्यांनी केला आहे.

याबाबत महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली गेले 18 दिवस मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने गुरुवारी काळी दिवाळी साजरी करण्यात आली. दरम्यान, पर्जन्य जलवाहिन्या कर्मचाऱयांच्या प्रश्नांबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पुढाकार घेऊन सोमवार, 12 नोव्हेंबरला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत योग्य तोडगा निघेल अशी कर्मचाऱयांना आशा असल्याचे संघटनेचे गौतम शिर्के यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या
महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुकारी 2015 रोजी किमान वेतन देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे, मात्र पालिकेने गेल्या तीन वर्षांत या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही.
कामगारांच्या वेतनानुसार विमा व भविष्य निर्वाह निधीची रक्कम पगारातून कापूनही अद्याप विमा कार्ड व पावती देण्यात आलेली नाही.
तीन पाळय़ांमध्ये आठ तासांहून अधिक काम करूनही ओव्हर टाइम मिळत नाही. कामगारांनी संघटना स्थापन केली म्हणून 18 कामगारांना कामावरून काढून टाकले त्यांना कामावर घ्यावे.

summary- bmc storm water drainage dept employees to go on strike

आपली प्रतिक्रिया द्या