बॉबीचा ‘बाबा निराला’ अवतार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या आगामी वेबसीरीजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. यामध्ये बॉबीचा अंदाज एकदम बघण्यासारखा आहे. काशीपूरवाले बाबा निराला ही व्यक्तिरेखा तो साकारत आहे. ‘आश्रम’चा ट्रेलर आणि त्यातील बॉबीचा अवतार बघून या वेबसीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ वेबसीरीज येत्या 28 ऑगस्ट रोजी एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.

बाबा निराला भक्तांच्या श्रद्धेचा कसा गैरफायदा घेतो आणि भयंकर गुन्हे करतो, याचे चित्रण ‘आश्रम’ वेबसीरिजमध्ये करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये असं दिसतंय, लोकांना मोक्षाच्या मार्गावर जाण्याचा सल्ला बाबा निराला देतोय. त्याचवेळी गेल्या तीन वर्षांत नऊ मुलींच्या गायब होण्याचा अहवाल येतोय. एकदा कुणी आश्रमात पाय ठेवला की त्याला परत यु टर्न घेता येणार नाही… असे डायलॉगही ऐकू येत आहेत. यावरून ‘आश्रम’च्या कथानकाचा अंदाज येतो. ‘आश्रम’ वेबसीरिजमध्ये आदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन, विक्रम कोच्छर, तुषार पांडे, सचिन श्रॉफ, राजीव सिद्धार्थ यांच्या भूमिका आहेत.