‘ओ साकी साकी ’ गाण्याच्या रीमेकवर कोयना मित्राची नाराजी

21

सामना ऑनलाईन । मुंबई

नोरा फतेहीच्या ‘ओ साकी साकी’ या गाण्याचा टीजर नुकताच युट्युबवर प्रदर्शित झाला आहे. हा टीजर पाहून बॉलीवूडची अभिनेत्री कोयना मित्रा भडकली आहे. हे गाणे 2004 मध्ये आलेल्या संजय दत्त, अनिल कपूर आणि समीरा रेड्डीच्या ‘मुसाफिर’ चित्रपटामधील ‘साकी साकी’  गाण्याचा रीमेक आहे. या गाण्यात कोयना मित्राने नृत्य केले होते. आता बाटला हाऊसमध्ये ‘ओ साकी साकी’ या गाण्याच्या रीमेकमध्ये नोरा फतेहीने आपल्या अदा दाखवल्या आहेत.

‘बाटला हाउस’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये जॉन अब्राइम मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये नोरा फतेहीने नृत्य केले आहे, तसेच जॉनच्या सत्यमेव जयते या चित्रपटात तिने दिलबर गाण्याच्या रीमेकवर नृत्य केले होते. या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले होते. युट्युबवर या गाण्याला कोटयवधी व्ह्युज आहेत. आता नुराने ओ साकीमध्ये डान्स केला आहे. कोयनाने या गाण्यावर नाराजी दर्शवली असून नुरा फतेही आपला आदर राखेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तिने ट्विट केले की, “ ‘मुसाफिर’ चित्रपटामधील माझ्या गाण्याला रीक्रिएट करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुनिधि-सुखविंदर यांचा आवाज तसेच विशाल शेखर यांचे संगीत होते. परंतू या गाण्याचे नवीन वर्जन मला अजिबात आवडले नाही. या गाण्याने अनेक ब्लॉकबस्टर रेकॉर्ड तोडले आहेत.  नुरा फतेही ही उत्तम नृत्यांगणा आहे. ”   या गाण्यातून ती आपला आदर कायम ठेवेले अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.