शगुफ्ताला बॉलिवूडमधून मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री शगुफ्ता अली आजारपण अन् आर्थिक संकटात आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याकडे काम नाही. कर्करोगाच्या उपचारात त्यांचा साठवलेला पैसा संपला. दागिने विकून त्यांना कुटुंबाचा गाडा चालवावा लागत आहे. अलीकडेच एका मुलाखतीच्या माध्यमातून शगुफ्ता यांनी पहिल्यांदाच आपली दुःखद कहाणी प्रेक्षकांसमोर आणली. त्यानंतर आता काही जण त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

‘डान्स दिवाने-3’च्या सेटवर शगुफ्ता यांनी आपले दुःख मांडले. त्यानंतर शोच्या टीमच्या वतीने माधुरी दीक्षितच्या हस्ते त्यांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीने शगुफ्ता भावुक झाल्या. माधुरीच्या आधी रोहित शेट्टीनेही त्यांना मदत केली. मदतीबद्दल रोहितचे आभार मानताना शगुफ्ता म्हणाल्या, मी रोहितला कधी भेटले नाही. त्याच्याशी कधी बोलले नाही. परंतु तरीही तो माझ्या मदतीला धावला. तो परोपवारी माणूस आहे. सिने अँड  टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेदेखील (सिंटा) शगुफ्ता यांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.