गरजूंच्या मदतीसाठी संगीत सितारे सरसावले, उद्या ‘व्हर्च्युअल’ संगीत मैफिलीचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटात कित्येक जण आपापल्या परीने गरजूंना मदत करत आहेत. बॉलिवूडचे 35 संगीत सितारेही आता मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी 5 जून रोजी ‘एक साथ – इंडिया विल राईज अगेन’ या व्हर्च्युअल काॅन्सर्टचे आयोजन केले आहे. या काॅन्सर्टमधून जमा झालेला निधी गरजूंना दिला जाणार आहे.

सोनू निगम, अलका याज्ञिक, शिल्पा राव, पैलास खेर, शान, हरिहरन, दलेर मेहंदी, अनुप जलोटा, सुरेश वाडकर, साधना सरगम, मालिनी अवस्थी, जतीन, राहुल पंडित, स्वप्नील बांदोडकर, सुगंधा दाते, अनुराधा पालपुर्थी, सुनयना काचरू भिडे, श्रेया काैल, आनंद शर्मा, तलत अजीज, अन्नू मलिक, मनोज मुंताशीर, निरजा पंडित आदी गायक, संगीतकार, गीतकार काॅन्सर्टमध्ये सहभागी होतील. अनुपम खेर फाउंडेशन, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांच्या आयएम बुद्ध फाउंडेशन, ग्लोबल कश्मिरी पंडित डायस्पोरा यांच्यावतीने संयुक्तरित्या हा कार्यक्रम होणार आहे. पल्लवी जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. कोरोनाचा फटका बसलेल्या अनाथ, विधवा, दिव्यांग तसेच अन्य गरजूंसाठी हा निधी वापरला जाणार आहे.